Skin Care: चेहऱ्यावर साबण लावणे त्वचेसाठी योग्य असते की नाही? जाणून घ्या याचा परिणाम

मुंबई: चेहरा सुंदर बनवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करत असतात. अशातच काही लोक साबणाचा वापर खूप करतात मात्र तुम्हाला माहीत आहे की साबणाचा वापर करणे योग्य असते की नाही?


चेहऱ्यावर सरळ साबण लावणे धोकादायक ठरू शकते. साधारणपणे चेहऱ्यावर साबण लावणे योग्य नसते. कारण साबणामध्ये कठोर केमिकल असतात जे त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच खाजही येऊ शकते. काही साबणामध्ये डिटर्जंट असतात ज्यामुळे त्वचा निस्तेज होते.


साबणाचा वापर केल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेची जळजळ तसेच लालसरपणा येण्याची शक्यता असते. साबणाचा वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचते. जर तुमची तेलकट त्वचा असेल कर ऑईल फ्री साबणाचा वापर करा.


दरम्यान, तुमच्या स्किनला साबण सूट होत असेल तर दिवसातून एकदा हलक्या हातांनी एकदा अथवा दोनवेळा साबणाचा वापर करा. चेहरा साबण धुतल्यानंतर मॉश्चरायजरचा वापर करा.


यामुळे त्वचा संतुलित राखण्यास मदत करेल. याशिवाय क्लिंजिंग मिल्क आणि ऑईल क्लिंजरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा काही लोकांना साबणामुळे अॅलर्जी होऊ शकते. जर असे घडले तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

Health : डाएटमध्ये सामील करा हे ड्रायफ्रुट्स, होणार नाही लिव्हरची समस्या

मुंबई : यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. त्याचे आरोग्य