उबाठा हा झटपट रंग बदलणारा सरडा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जहरी टीका


छत्रपती संभाजीनगर : युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.


छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सभेपूर्वी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले.


गेल्या निवडणुकीत गडबड झाली. पण या निवडणुकीत दोघांच्या भांडणात धनुष्यबाणाला लाभ होणार आणि महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ही निवडणूक देशाच्या विकासाची प्रगती आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार चारसो पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत. २०१४ नंतर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण मोदींनी दहशतवाद रोखला.


मोदींकडून ८० कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. त्यात फक्त हिंदू आहेत का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आम्हाला मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात हे तुम्हाला पसंत आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे सहन होत नसल्याने शिवी देण्याचे प्रकार सुरु आहे. हा शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे. मी या आरोपाला कामाने उत्तर देतो. सूज्ञ मतदार मतपेटीतून उत्तर देऊन उबाठाला घरी बसवतील. ही काळ्या दगड्यावरील भगवी रेघ आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


आयरे गैरे व्यक्तींचा इतिहास सर्वांना माहित असल्याने त्यांच्याबाबत न बोललेले बरे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. संदिपान भुमरे हाडाचा कार्यकर्ता असून त्यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे, विनोद बनकर यांनी दलित बांधवांना स्टेजवरून खाली उतरवले हा दलितांचा अपमान आहे. काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांचा केवळ व्होटबॅंक म्हणून वापर केला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दलित बांधवानी या अपमानाचा बदला घेऊन महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आजच्या रॅलीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या