Monday, July 15, 2024
Homeक्रीडाटी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली...

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे साधारण निश्चित आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लववकरच मुख्य निवड प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. त्यादरम्यानत हे रिपोर्ट समोर आले आहेत. रोहित शर्मा २७ एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी अजित आगरकर यांची भेट घेऊ शकतो. दरम्यान, केएल राहुलला बॅकअप कीपरच्या रूपात ठेवले जाईल अशी बातमी समोर आली आह. अशातच ऋषभ पंतची भारतीय संघाच्या प्लेईंग ११मधील जागा पक्की आहे. पंतने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ३४२ धावा ठोकल्या आहेत.

संजू सॅमसननेही आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. हंगामात एकीकडे सॅमसनने ३१४ धावा केल्या आहेत तर राहुल ३०२ धावांवर आहे. दरम्यान, राहुलला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

बिश्नोई गेल्या काही मालिकांमध्ये नियमितपणे भारतीय संघात लेग स्पिन गोलंदाजाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तो या शर्यतीत आहे. मात्र सध्याच्या आयपीएलमध्ये त्याने केवळ ५ विकेट घेतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -