मुंबई: अंकज्योतिषला अंकशास्त्र अथवा न्यूमरोलॉजी असेही म्हटले जाते. ही यात अंक आणि ग्रह यांच्यातीस संबंधांचा अभ्यास केला जातो. अंक ज्योतिषमध्ये प्रामुख्याने १ ते ९ अंकाचा वापर केला जातो. याला मूलांक असे म्हणतात.
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाची एक खास गोष्ट असते. यानुसार काही मूलांकाच्या लोकांमध्ये जन्मजात अधिकारी बनण्याचे गुण असतात. हा मूलांक असलेल्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते.
अंक ज्योतिषमध्ये मूलांक १च्या लोकांना खूप विशेष मानले गेले आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य असतो. याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. या मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा विशेष प्रभाव असतो. या लोकांमध्ये जन्मापासूनच नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असते.
मूलांक १ चे व्यक्ती आपली मेहनत आणि क्षमतेवर सरकारी नोकरी मिळवतात. तसेच आपल्या टीमचे नेतृत्व करतात. हे लोक साहसी आणि जोखीम घेणारे असतात. तसेच हे नियमबद्ध आणि व्यवस्थित असतात. आपल्या याच खुबीमुळे ते दुसऱ्यांपासून वेगळे दिसतात.
या मूलांकाच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याचे योग असतात. मात्र या मूलांकाचे लोक चांगले नेतेही बनू शकतात. याशिवाय हे लोक इलेक्ट्रॉनिक, अॅम्बेसी, रिसर्च वर्क, वीजेशी संबंधित व्यवसाय करू शकतात.
मूलांक १चे लोक आपल्या जीवनात अनेक आव्हानांचा सामना करतात. मात्र आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वासामुळे ते विजय मिळवू शकतात. या मूलांकाचे लोक दुसऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनतात. तसेच जगात सकारात्मक बदल आणतात.
दरम्यान, मूलांक १चे लोक कधी कधी अहंकारी आणि जिद्दीचे असतात. हे लोक काही निर्णय घाईघाईत घेतात. हे लोक लवकर बदलासाठी तयार नसतात.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…