IPL 2024 Points Table: विजयासह दिल्ली कॅपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये घेतली मोठी उडी

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) मिळालेल्या विजयाचा पॉईंट्स टेबलमध्ये खूप फायदा झाला आहे. ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला मात्र नुकसान सोसावे लागले. दिल्लीने अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्यासाठी ऋषभ पंतने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने नाबाद ८८ धावा केल्या. तर अक्षऱ पटेलने अर्धशतक ठोकले.


आयपीएल २०२४चे पॉईंट्स टेबल पाहिले असता यात राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ८ सामने खेळलेत त्यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला. राजस्थानकडे १४ गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहेत.


केकेआरने ७ सामने खेळले आहेत आणि ५ मध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे १० गुण आहेत. सनरायजर्स हैदराबादची स्थितीही हीच आहे. त्यांचा नेट रनरेट केकेआरपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनऊने ८ सामने खेळले आहेत त्यापैकी ५मध्ये विजय मिळाला आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत.



दिल्लीला विजयामुळे मिळाला फायदा


दिल्लीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आला आहे. त्यांनी ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ मध्ये विजय मिळवला. त्यांचे ८ गुण आहेत. तर गुजरात ७व्या स्थानावर आहे. त्यांनीही ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ सामन्यांत विजय मिळवला. मात्र दिल्लीचा नेट रनरेट गुजरातपेक्षा चांगला आहे.


चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ ८व्या आणि पंजाबचा संघ ९व्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: भारत वि वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीला सुरूवात, भारताचा फलंदाजीचा निर्णय

दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला दिल्लीमध्ये सुरूवात झाली आहे. भारताने टॉस जिंकत

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने