सप्तशृंगी गडावरून बंदोबस्त आटोपून घरी निघालेल्या दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू

दिंडोरी : ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मॅक्स टॅक्सी क्रं. एमएच १५ / ई २१३२ ही नाशिकहून वणीकडे येत असताना समोरून येणारी हुन्दाई कंपनीची व्हरना कार क्रं. एमएच १५ / डीएम ९१८३ यांच्यात धडक झाली.


यात व्हरना कार मधील ज्ञानेश्वर नारायण रौंदळ वय (५२) व रेणुका भिकाजी कदम (४६) हे रा. पोलीस वसाहत, शहर आयुक्तालय, नाशिक हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी यांनी तपासून मृत घोषीत केले.


याबाबत वणी पोलिसांनी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

Nashik News : सावधान! ५-१० रुपयांची कुल्फी पडेल महागात! नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.