मुंबई: भारतासह जेव्हा जगभरात क्रिकेटची चर्चा होते तेव्हा सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) हे नाव आपसूकच येते. सचिन आणि क्रिकेट हे एक समीकरणच आहे. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये जे योगदान दिले आहे ते कोणताही क्रिकेटचाहता विसरू शकत नाही. १०० शतके आणि २०० कसोटी सामने खेळणारा सचिन जगातील एकमेव क्रिकेटर आहे. म्हणूनच त्याला कदाचित क्रिकेटचा देव म्हणत असतील.
आज २४ एप्रिलचा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे कारण सचिन ५१ वर्षांचा झाला आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये इतके रेकॉर्ड बनवले आहे की क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव सोनेरील अक्षरातच लिहिले गेले आहे. भले त्याने क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरीही कमाईच्या बाबतीत तो आजही सुपरहिट आहे. जाणून घेऊया किती आहे त्याची नेटवर्थ आणि ब्रांड एम्बॉर्समेंटच्या माध्यमातून तो किती कमाई करतो.
आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ला मुंबईमध्ये झाला होता. आता तो ५१ वर्षांचा झाला आहे. क्रिकेटच्या करिअरदरम्यान जिथे एकीकडे मोठमोठे रेकॉर्ड केलेत तर दुसरीकडे कमाईतही त्याचे रेकॉर्ड आहेत. जगातील श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत सचिन तेंडुलकरची गणना केली जाते. रिपोर्ट्सनुसार गेल्या वर्षी २०२३ पर्यंत सचिन तेंडुलकरची नेटवर्थ १७५ मिलियन डॉलर म्हणजेच १४३६ कोटी रूपये होती. खास बाब म्गणजे भले त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जाहिराती आणि इतर माध्यमातून तो कोट्यावधी रूपये कमावत आहे.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही अनेक मोठमोठे ब्रँड त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि अनेक कंपन्या जाहिरातीसाठी सचिनला पसंती देतात. सचिनला Boost, Unacademy, Castrol India, BMW, Luminous India, Sunfeast, MRF tires, Aviva Insurance, Pepsi, Adidas, Visa, Luminous, Sanyo, BPL, Philips, Spinny या जाहिरातींमध्ये दिसला आहे.
सचिन तेंडुलकर बिझनेसमध्येही कार्यरत आहे. त्याचा क्लोथिंगचा बिझनेस आहे. रिपोर्टनुसार त्याचे ब्रांड ट्रू ब्लू अरविंद फॅशन ब्रांड्स लिमिटेड यांच्यात एक जॉईंट वेंचर आहे. याला २०१६मध्ये लाँच करण्यात आले होते. मुंबई आणि बंगळुरूमध्ये सचिन अँड तेंडुलकर्स नावाचे रेस्टॉरंट आहे.
सचिन तेंडुलकरच्या लक्झरी लाईफस्टाईलचा अंदाज त्याची आलिशान घरे पाहूनही लावला जाऊ शकतो. त्याच्याकडे मुंबईचा पॉश एरिया वांद्रेमध्ये अलिशान बंगला आहे. याची किंमत १०० कोटी रूपये आहे. दरम्यान हे घर त्याने २००७मध्ये ४० कोटींना खरेदी केले होते. मुंबईतच नव्हे तर कोट्यावधींचा केरळमध्येही त्याचा बंगला आहे. काही रिपोर्ट्समध्येही हेही सांगितले आहे की त्याच्याकडे ब्रिटनच्या लंडनमध्ये स्वत:चे घर आहे.
सचिन तेंडुलकरलाही विविध कारचाही छंद आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकाहून एक शानदार कार आहेत. रिपोर्ट्सनुसार त्याच्या कलेक्शनमध्ये महाcगड्या आणि लक्झरी कार आहेत. यात Ferrari 360 Moden, BMW i8, BMW 7 Series, 750Li M Sport, Nissan GT-R, Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre यांचा समावेश आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…