मुंबई: शरीर गरम झाल्याने अथवा डिहायड्रेशन झाल्यास भरपूर पाणी प्यावेसे वाटत असेल तर एकत्र खूप पाणी पिऊ नका. ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. यामुळे वॉटर टॉक्सिसिटी होणार नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येत असल्याने तहानही खूप लागते. लोक डिहायड्रेशनपासून बचावासाठी सतत पाणी पित असतात. आरोग्य तज्ञही यावेळेत पाणी खूप पिण्याचा सल्ला देतात.मात्र अनेकदा तहान भागवण्यासाठी भरपूर पाणी पिणेही तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते.
भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्राणही जाऊ शकतात. याला वॉटर टॉक्सिसिटी म्हणतात. यामुळे कधीही एकत्रित भरपूर पाणी पिऊ नये.
उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि सतत तहान लागते. ही तहान भागवण्यासाठी अनेकजण एक दोन ग्लास पाणी पिण्याऐवजी खूप पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडू लागतो आणि सोडियमचे प्रमाण अचानक कमी होते.
रक्तात सोडियमची कमतरता जाणवल्याने शरीरात सूज निर्माण होऊ शकते. याचा योग्य वेळी उपचार झाला नाही तर मृत्यूही ओढवू शकतो.
त्यामुळे भरपूर तहान जरी लागली असली तरी एकाच वेळेस भरपूर पाणी पिऊ नका. याशिवाय नारळपाणी, लिंबू पाणी, फ्रेश फ्रूट ज्यूस प्यायल्याने तहान भागते.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…