DC Vs GT: ऋषभ पंतने नाबाद ८८ धावांची खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ४ बाद २२४ अशी मोठी मजल मारली. पंत त्याच्या उत्कृष्ट खेळात होता आणि त्याने आपल्या अप्रतिम पॉवर हिटिंगच्या सहाय्याने मैदानात गुजरातच्या गोलंदाजांना चोपले. पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने तीन विकेट गमावल्या, परंतु अक्षर पटेल आणि पंत यांनी ११३ धावांची खेळी दिल्लीला तारले. पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी स्लॉग ओव्हर्समध्ये डीसी इनिंगला अचूक फायनल पुश दिला आणि त्यामुळे गुजरातसमोर धावांचा डोंगर उभा राहिला.
गुजरातची फलंदाजांनी देखील आक्रमक खेळी करत त्या धावांचा पाठलाग केला, पण धावा जमवण्याच्या नादात गुजरातने विकेट गमावल्या. सातव्या नंबरवर आलेल्या राशीद खानने खेळाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जोरदार झुंज दिली पण ती व्यर्थ गेली कारण दिल्ली कॅपिटल्सने येथे ४ धावांनी सामना जिंकला. रशीदने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले आणि त्यानंतर दोन चेंडु वाया गेले. अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडू राशीद खानने पाचव्या चेंडूवर षटकार खेचला ज्यामुळे अंतिम चेंडूवर ५ धावा शिल्लक होत्या. त्याने पुन्हा एकदा आपली बॅट जोरात फिरवली पण त्याला षटकार मारण्यात तो अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा फक्त ४ धावांनी पराभव केला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…