Nitesh Rane : राजकीय विरोधकांवर खोट्या केसेस टाकणं ही उद्धव ठाकरे सरकारची फुल टाईम ड्युटी!

आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


मुंबई : 'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुलाखतीनंतर मातोश्रीमध्ये बर्नोलचं प्रमाण फार वाढलं आहे. छातीच्या गोळ्या ज्या एकदा घेतल्या जात होत्या त्या दोनदा घेतल्या जात आहेत. मविआचं सरकार कसं चालायचं? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे प्रमुख या पदाचा वापर फक्त आपले हिशेब चुकते करण्यासाठी कसा करायचे, या सगळ्याचं सत्य एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाखतीतून सांगितलं. त्यामुळे मातोश्रीवर हे चित्र आहे', असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप असल्याचा खोटा दावा करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) व उद्धव ठाकरेंचा नितेश राणे यांनी खरपूस समचार घेतला.


नितेश राणे म्हणाले, यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो. म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा सरकारचा निर्णय वाटतो? उद्धव ठाकरेच विरोधकांवर चुकीचे कलम लावून त्यांना अटक करा, असे आदेश द्यायचे हे सांगायची हिंमत का होत नाही? गिरीश महाजनजी, प्रविण दरेकरजी, प्रसाद लाडजी किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्या राजकीय विरोधकांना कुठल्याही प्रकारे अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं २४ तास काम असायचं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.


उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्यापलीकडे, त्याच्या मुलाने बॉलीवूडमध्ये पार्ट्या करण्यापलीकडे आणि वैभव चेम्बर्समध्ये भ्रष्टाचार करण्यापलीकडे, पैसे कमावण्याच्या बैठका घेण्यापलीकडे काहीही केलं नाही. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता, रश्मी शुक्ला मॅडमसंदर्भात. खरं तर खोटे गुन्हे कसे तयार करायचे, यावर उद्धव ठाकरेंनी आता पीएचडी केली पाहिजे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


फडणवीस साहेबांना अटक करायची हिंमत जर उद्धव ठाकरेने केली असती तर उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर कसे पडले असते, हे आम्ही पाहिलं असतं, असं नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले, फोन टॅपिंगबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही पण ऐकलं आहे की, मातोश्रीमध्ये रश्मी ठाकरे यांनी आयटीची दोन-तीन मुलं बसवून ठेवली होती. त्यांच्या आदेशावरुन असंख्य विरोधकांचे फोन हॅक व्हायचे. त्यामुळे उगाच आमच्या नेत्यांच्या नावाने खडी फोडण्यापेक्षा तुझ्या मातोश्रीवरच्या मालकिणीला आवर, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर