मुंबई : डिश टीव्हीने (Dish TV) भारतातील मनोरंजन (Entertainment) अनुभव पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक अग्रगण्य पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात, आघाडीच्या डीटीएच प्रदात्यांसाठी ‘डिश टीव्ही स्मार्ट+’ (Dish TV Smart +) सेवांची अभूतपूर्व ऑफर जाहीर केली आहे. याद्वारे ग्राहकांना कोणत्याही स्क्रीनवर, कुठेही, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय टीव्ही सबस्क्रिप्शनसह (TV Subscription) ओटीटी सेवांचाही (OTT) आनंद घेता येणार आहे. यामुळे सुविधा, लवचिकता आणि सुधारित मनोरंजन सुनिश्चित केले जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांचा पाहण्याचा अनुभव आणखी वाढेल.
‘डिश टीवी स्मार्ट+’ सर्विसेज सह, नवीन आणि विद्यमान ग्राहकांसह सर्व डिश टीव्ही आणि डी2एच ग्राहक त्यांच्या निवडलेल्या टीव्ही सबस्क्रिप्शन पॅकसह लोकप्रिय ओटीटी ॲप्सचा आनंद घेऊ शकतात. ‘डिश टीवी स्मार्ट+’ सेवा इकोसिस्टम कधीही, कुठेही कोणत्याही स्क्रीनवर वॉचो – ओटीटी सुपरॲप, सेट-टॉप बॉक्सेससह स्मार्ट डिव्हाइसेस आणि स्मार्ट एंड्रॉयड एसटीबीच्या माध्यमातून तुम्ही मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.
नवीन ऑफरवर टिप्पणी करताना, डिश टीव्ही इंडिया लिमिटेडचे सीईओ, मनोज डोभाल म्हणाले, ‘स्थापनेपासून, डिश टीव्हीने मनोरंजनाच्या उपभोगाच्या लँडस्केपमध्ये बदल केला आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडत्या कॉन्टेन्टचा आनंद घेण्यासाठी अनेक नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्ग देण्यात आले आहेत. या नवीन ऑफरसह, आम्ही मनोरंजन अनुभवांसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करून क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहोत. निवडींनी भरलेल्या बाजारपेठेत, ग्राहक अनेकदा भारावून जातात. आमचा उद्देश सर्वांगीण आणि संपूर्ण मनोरंजन उपाय ऑफर करून त्यांची निवड सुलभ करणे आहे. पारंपारिक टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म हे दोन्ही आजच्या युगात आवश्यक आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या प्रस्तावासह, त्यांना समान महत्त्व देण्याचे आमचे ध्येय आहे.”
मनोज डोभाल पुढे म्हणाले, “डिश टीवी वर ग्राहकांच्या समाधानाशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि प्रत्येक निर्णय मूल्य आणि सुविधा प्रदान करण्यावर केंद्रित असतो. ‘डिश टीव्ही स्मार्ट+’ सेवा केवळ आमच्या ग्राहकांना मनोरंजनासाठी अतुलनीय प्रवेश प्रदान करून फायदा देत नाहीत तर त्यांची प्राधान्ये आणि समाधान आमच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर राहतील याची खात्री देखील करतात. ‘डिश टीवी स्मार्ट+’ सेवांद्वारे, आम्ही आधुनिक भारतीय कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करत आहोत, आमच्या ब्रीदवाक्यानुसार जगत आहोत – ‘नए भारत का स्मार्ट कनेक्शन’.
या दूरदर्शी प्रस्तावाचा प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, डिश टीव्हीने टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट आणि कॉर्पोरेट आउटरीचसह विविध चॅनेलवर एक व्यापक विपणन मोहीम सुरू केली आहे. विद्यमान ग्राहकांसाठी, डिश टीव्ही त्याच्या चॅनेल आणि प्लॅटफॉर्मचा फायदा घेईल, पुश नोटिफिकेशन, इन-ॲप नोटिफिकेशन आणि ईमेलरचा वापर करेल. दरम्यान, नवीन ग्राहकांसाठी, ऑफरची व्यापक दृश्यता आणि जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी टीव्ही आणि डिजिटल चॅनेलवर भर दिला जाईल.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…