मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा लहान मुले आजारी पडतात. त्यांची तब्येत खराब होण्याचे कारण म्हणजे त्यांचे शरीर पूर्णपणे मजबूत नसते. मात्र आपण जर सावधानता बाळगली तर त्यांना आजारापासन वाचवू शकतो.
उन्हाळ्यात मुलांना खूप पाणी प्यायला द्या यामुळे ते हायड्रेट राहतील. तुम्ही त्यांना टेस्टी लागणारे लिंबू पाणीही देऊ शकता.
नेहमी मुलांना सुती आणि हलके कपडे घालावेत. असे कपडे घातल्याने ते आरामात राहतील आणि त्यांना कमी गरम होईल.
जेव्हा मुले बाहेर जातील तेव्हा चेहऱ्यावर आणि हातांवर सनस्क्रीन लावा. यामुळे त्यांचा सूर्याच्या किरणांपासून बचाव होईल.
उन्हापासून मुलांचा होईल तितका बचाव करा. संध्याकाळच्या वेळेस थंड ठिकाणी त्यांना खेळण्यास द्या. यामुळे ते खुश आणि ताजेतवाने होतील.
उन्हाळ्यात मुलांना खाण्यासाठी हलके अन्न द्या. अनेक फळे तसेच भाज्यांचा आहारात समावेश करा.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…