Summer special: उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीम लावावी की नाही? घ्या जाणून

मुंबई: उन्हाळा(summer) येताच त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात. अशातच अनेकजण यापासून बचावाचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा आराम मिळत नाही. बरेचजण उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीमचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यावर क्रीम लावणे उन्हाळ्याच्या दिवसांत चांगले असते की नाही ते. जर तुम्हाला हे माहीत नाही तर आण्ही या लेखात याबद्दल सांगत आहोत...



चेहऱ्यावर क्रीम लावणे योग्य?


उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करणे थोडे कठीण असे. कडक उन्हामुळे सतत घाम येत असतो. यामुळे आपली त्वचा काळवंडते. अशातच चेहऱ्यावर क्रीम लावणे फायदेशीर ठरू शकते. तर काही लोकांना यामुळे नुकसानही होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी तुम्ही चेहऱ्यावर क्रीम लावू शकता. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.



या गोष्टींची घ्या काळजी


क्रीम धूळ आणि घाणीपासून त्वचेला वाचवण्याचे काम करते. मात्र लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात खूप क्रीमचा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि पिंपल्स येऊ शकतात. त्वचेच्या हिशेबाने क्रीमचा वापर करा. अनेकदा तेलकट त्वचेवर काही क्रीम सूट करत नाहीत यामुळे पिंपल्स आणि चेहरा आणखी तेलकट दिसू लागतो.



तेलकट त्वचेवरील उपचार


जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीम अथवा जेलचा वापर केला पाहिजे. जेव्हा क्रीमची निवड करा तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. कोणत्याही नव्या क्रीमचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट जरूर करा. चेहरा दिवसांतून २ ते ३ वेळा थंड पाण्याने जरूर धुवा.

Comments
Add Comment

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर