Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीरामनवमीला सीतारामपंतास रामदर्शन

रामनवमीला सीतारामपंतास रामदर्शन

समर्थ कृपा – विलास खानोलकर

सीतारामपंत नेने हे गारोडे येथील राहणारे. आपल्याला श्री रामाचा साक्षात्कार व्हावा; म्हणून राम उपासना कडकरीतीने करीत असत. पुढे समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटमध्ये आले. महाराजांचे दर्शन होताच, ते वैभव पाहून त्यांना अतिशय समधान वाटले आणि ‘मला आज राम भेटला’ असे त्यांना वाटले. मग माधुकरी मागून श्रींची सेवा करण्याकरिता ते तेथेच राहिले. त्यांनी सेवा अशी चालविली की, नित्य माधुकरी आणून जेवावे आणि श्रींसमोर राम उपासनेची माळ घेऊन जप करीत बसावे. त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाजवळ भाषण अगदी वर्ज्य केले होते. काही दिवस गेल्यावर एके दिवशी दोन प्रहरी त्यांस स्वप्नात रामरूपाने दर्शन दिले.

स्वामी समर्थ बखर गोपाळबुवा केळकर हे त्यावेळची इंग्रजी तिसरी शिकलेले होते. ते सुरुवातीस नास्तिक होते. परंतु त्यांना आस्तिक बनविण्यासाठी श्री स्वामींना वरील लीला करावी लागली.

“नरदेही नरसिंह। प्रगटला तरू पोटी। नास्तिकाच्या कश्यपूला। आस्तिकाची देण्या गती।।’

हाच तर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा गाभा आणि हेतू आहे. गोपाळबुवांसारख्या सुशिक्षित नास्तिकाला गती देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बखरीचे लिखाण करून घेण्यासाठीच श्री स्वामींना ही लीला करावी लागली.

जीवघेण्या दुखण्याला कंटाळून बुवा निर्वाणीचे बोलले, “जो कोणी या जगाताचा ईश्वर असेल, त्याने ८ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली, तर उरलेल्या माझ्या आयुष्यात त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही.” बुवांच्या या घोर प्रतिज्ञेने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. श्री स्वामींनी बुवांची व्याधी दूर केली. आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी गोपाळबुवा केळकरांची होती. ती त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या, ऐकून खात्री करून घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली. तीच ‘श्री स्वामी समर्थ बखर.’

रामनवमीचा स्वामी संदेश…

मनात जनात कामात ठेवा राम ।।१।।
रक्ताच्या थेंबाथेंबात राहतो राम
तुमच्यासाठी राम जेव्हा म्हणेल राम ।।२।।
स्वामी नाम प्रचंड सशक्त
रामासारखे व्हा तुम्ही पितृभक्त ।।३।।
रामासारखे व्हा तुम्ही मातृभक्त
रामासारखे व्हा तुम्ही गुरुभक्त ।।४।।
रामासारखे व्हा तुम्ही स्वामीभक्त
रामश्याम दत्तभक्त मातृभक्त ।।५।।
स्वामीभक्त रामाचे पाळा नियम
पाळा एक वचनी एक बाणी नियम ।।६ ।।
एक पत्नी, एक व्रती उत्तम नियम
बंधुप्रेम, देशप्रेम, प्राणी प्रेम नियम ।।७।।
निसर्गप्रेम नदिनाली प्रेम नियम
प्रेमवचन, पितृवचन सत्य नियम ।।८ ।।
साऱ्या जगात पाना पाण्यात राम
रानावनात फुलाफळात सुगंधी राम ।।९।।
चांगल्या कार्यात हसण्याबोलण्यात राम
लंकादहनात रावणा मारण्यात राम ।।१०।।
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सारे राम
सुग्रीव, अंगद, जांभुवत, हनुमान सारे राम ।।११।।
नर, वानर, जटायु, खार सारे राम
सुवर्ण हरीण, विभीषण एकक्षण राम ।।१२।।
तात्काळ पूर्ण करा चांगले काम
स्वच्छ ठेवा नदी-नाले देवधाम ।।१३।।
गंगा यमुना, जमुना, सीता, देवीधाम
भरपूर फुले, फळे झाडे लावा काम ।।१४।।
सर्व पृथ्वीच जगवणे रामाचे काम
अणुयुध्द टाळणे मानवजात वाचवणे काम ।।१५।।
अणुरेणुत दत्त, स्वामी एक नाम
दुःखे गोपाळ बुवांची दूर
केली घेता स्वामी नाम ।।१६ ।।
गोपाळ केळकरांच्या बखरीत स्वामी नाम
दिनरात तुम्ही घ्या राम स्वामी नाम ।।१७ ।।
रामनवमीला पूर्ण केली स्वामीनाम
जेथे जेथे ईश्वरनाम तेथे तेथे स्वामीनाम ।।१८।।
स्वामी भक्तासाठी उभे
भक्त स्वामीदर्शनार्थ उभे ।।१९।।
येई कधी स्वामी स्वप्नी
प्रत्येक भक्ताची अलग कथनी ।। २० ।।

vilaskhanolkarkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -