Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडी

Raj Kundra: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज कुंद्रावर ईडीची कारवाई!

Raj Kundra: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज कुंद्रावर ईडीची कारवाई!

तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ३ वर्षापूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावर त्याने जामीनही मिळवला होता. राज कुंद्रावरील पॉर्नोग्राफीचे प्रकरण निवारत असताना आता ईडीने राज कुंद्रा विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्याच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तब्बल ९७.७९ कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.


ईडीने बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेयर यांचा समावेश आहे. राज कुंद्राला यूक्रेनमध्ये मायनिंग फार्म उभं करण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रमोटर आणि मास्टरमांइंड अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स घेतले होते. तर या सगळ्या प्रकरणात राज कुंद्रानं हेराफेरी केली होती, असा ईडीने केलेल्या चौकशीत खुलासा झाला आहे.


यापूर्वीही राज कुंद्राची २००० कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की; ठाणे क्राइम ब्रान्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडलेल्या प्रकरणामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment