मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ (Heat) झाली आहे. घराबाहेर पडताच उन्हाच्या इतक्या झळा बसतात की अंगाची लाहीलाही होते. मुंबईसारख्या (Mumbai) ठिकाणी तापमान ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर दुसरीकडे विदर्भ (Vidarbha), मराठवाड्याला (Marathwada) मात्र पावसाने झोडपून काढले आहे. या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे माणसे, जनावरे दगावली आहेत, तर अनेक घरांचे व शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान कात्याने राज्यभरातील वातावरणाचे अंदाज वर्तवले आहेत.
राज्यात पुढील २४ तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुढील २४ तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या देखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर कोकणात कमाल तापमान ४० च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…