Child : दररोज सकाळी मुलांना जरूर सांगा या ५ गोष्टी, होतील फायदे

मुंबई: मुलांचा दिवस चांगला जावा यासाठी सकाळची सुरूवात आनंददायक झाली पाहिजे. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम मुलांवर मोठ्या प्रमाणात होत असतो. जर सकाळी-सकाळी मुलांना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी सांगितले तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. येथे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून मुले केवळ खुशच होणार नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.



सकाळी सकाळी प्रेमाने भेटा


सकाळी उठताच मुलांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा आणि त्यांना मिठी मारा. तुमचे हास्य आणि तुमचा उत्साह त्यांना संपूर्ण दिवस खुश आणि सुरक्षित वाटेल. हे साधारण प्रेम त्यांना दिवसभरासाठी ताजेतवाने करेल.



थोडा वेळ एकत्र बसा


सकाळच्या वेळेस घाईगडबड करू नका. काही वेळ आपल्या मुलांसोबत बसून गप्पा मारा. यामुळे त्यांना वाटेल की आपण त्यांना किती किंमत देतो. हा थोडासा वेळ त्यांच्यासाठी खास असू शकतो आणि तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.



स्वप्नांबाबत बोला


सकाळी मुलांना त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारा आणि दाखवा की प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी किती खास आहे. ते खुलेपणाने यावेळी तुमच्याशी बोलतील. हे साधारण बोलणे तुमच्यावरील विश्वास आणि स्वत:ला सुरक्षित राहण्यास मदत करतील.



प्रेम दाखवा


सकाळी उठताच आपल्या मुलाला सांगा की तुझा चेहरा पाहिल्यावर मला किती आनंद होतो ते. हे साधे वाक्य त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढवण्यास मदत करेल. त्यांना स्पेशल वाटेल.



दिवसाची सुरूवात उत्साहाने करा


सकाळी उठल्यावर आपल्या मुलाला विचारा की आज ते काय करणार आहेत. त्यांच्या योजनांमध्ये आवड दाखवा. यामुळे ते अधिक उत्साही होतील आणि दिवस आनंदाने सुरू होईल.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात