मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध

२५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात


मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत पालिका,सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार ३० एप्रिल पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत,असे आवाहन पालिकेने केले आहे .


आरटीई अंतर्गत दुर्बल,वंचित,शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार,मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.


प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आजपासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)राजेश कंकाळ यांनी दिली आहे. आरटीई अंतर्गत मुंबईतील एस.एस.सी. बोर्डाच्या १३१९ तर अन्य ६४ अशा मिळून १३८३ पात्र शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस.एस.सी. बोर्ड २७ हजार ८६९ तर अन्य ११४५ जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानीत खासगी शाळांसाठी लागू असायची. मात्र, या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास २० हजार जागादेखील वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून १ किलोमीटरच्या आत असणाऱया शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

Comments
Add Comment

नामनिर्देशन पत्रे, निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना दिली माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ.

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Manikrao Kokate : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली!

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती; आमदारकी कायम राहणार, पण लाभाचे पद धारण करता

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी