Ram Navmi 2024 : राम जन्मला ग सखी; जाणून घ्या रामनवमीची तिथी, महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत

मुंबई : रामनवमी भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्री रामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला, कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी करण्याची परंपरा आहे. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. यंदा लाखो भाविक प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचणार आहेत. जाणून घेऊया रामनवमीचे महत्त्व, तिथी, शुभ मुहूर्त आणि घरी पूजा करण्याची पद्धत.



श्रीराम नवमीचे महत्त्व


भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला 'राम नवमी' म्हणतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीरामाचा जन्म झाला म्हणून यास राम नवमी म्हणतात. भगवान विष्णूच्या सातवा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात. पौराणिक कथेनुसार, पृथ्वीतलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला. धार्मिक ग्रंथांनुसार, कलियुगात, मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो. माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून भगवान राम याना खूप महत्व आहे .



चैत्र महिन्यात रामनवमी कधी असते?


पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील नवमी तिथी मंगळवार, १६ एप्रिल रोजी दुपारी १:२३ पासून सुरू होईल आणि नवमी तिथी १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल. उदया तिथीतील नवमी तिथीमुळे १७ एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवस रवि योग असणार आहे.


प्रभू रामाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्यक्तीने या दिवशी रामायण आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. या दिवशी प्रभू रामाच्या मंदिरात जाऊन त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच पिवळ्या फुलांची माळ अर्पण करून त्याची स्तुती करावी.



राम नवमी २०२४ शुभ मुहूर्त -


रामनवमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:०१ ते दुपारी १:३६ पर्यंत आहे. पूजेचा एकूण कालावधी २ तास ३५ मिनिटांपर्यंत आहे.


विजय मुहूर्त- दुपारी २:३४ ते ३:२४ पर्यंत.
संध्याकाळचा - ६:४७ ते ७:०९पर्यंत.



अशा प्रकारे रामनवमीची पूजा घरी पूजा करु शकता:



  • पूजेसाठी सर्वप्रथम लाकडी स्टूल घ्या. त्यावर लाल रंगाचे कापड पसरवा.

  • यानंतर भगवान राम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमानजी यांचा समावेश असलेली श्री राम परिवाराची मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून स्थापित करा.

  • यानंतर सर्वांना चंदन किंवा रोळीने तिलक लावावा. त्यानंतर त्यांना अक्षत, फुले इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे.

  • यानंतर तुपाचा दिवा लावा आणि रामरक्षा स्तोत्र, श्री राम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करा.

  • आपण इच्छित असल्यास, आपण या दिवशी सुंदर कांड किंवा हनुमान चालीसा देखील पाठ करू शकता.


रामनवमीसाठी विशेष नैवेद्य


श्रीरामाच्या पुजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे. या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत, श्रीखंड, खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो. श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तूपाच विशेष महत्त्व आहे. यामुळेच रामनवमीच्या दिवशी तूपापासून बनवलेल्या मिठाई खाल्ली जाते. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर, केशर भात किंवा धण्याचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी, गुलाबजामून किंवा कलाकंदचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं.


Comments
Add Comment

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

Shocking Case in Lucknow : पत्नीला तलाक पाहिजे होता म्हणून पतीला...लखनऊमधील विचित्र घटना

लखनऊ : उतर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. एका महिलेने पतीकडून घटस्फोट मिळवता यावा

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे