मुंबई: गरजेपेक्षा मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला मानसिकरित्या आजारी बनवू शकतो. आरोग्य तज्ञ म्हणूनच मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. याच्यामुळ एक नव्हे तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
गरजेपेक्षा फोनचा अधिक वापर केल्याने तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात. रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय नुकसानदायक असते. यामुळे डोळे खराबही होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतरजर झोपण्याच्या वेळेस तुमचा संपूर्ण फोकस स्मार्टफोनवर असेल तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळणार नाही. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडते.
रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याचा सगळ्यात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे झोपेत व्यत्यय. मोबाईल फोनमुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलाटोनिन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे अनिद्रेचा त्रास होतो.
जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत आहात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. मोबाईलमधून निघाणाऱ्या किरणांचा परिणाम डोळ्यांवर होतो.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल सुरू ठेवणे मेंदूच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि विसरभोळ्याची समस्याही वाढते.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…