Water Shortage: पाणी नाही तर मतदान नाही! पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त कल्याण रहिवाशांचा संताप

कल्याण : वाढते तापमान व उन्हाच्या कडक झळांमुळे लोकांना पाण्याची अधिक गरज भासून येते. एकीकडे निवडणुकीचे वारे तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या समस्या जास्तच तीव्र झाल्या आहेत. कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रशासन आता तरी या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देते का हे पहावे लागेल. (kalyan loksabha election)


अंबरनाथ पूर्वेच्या कानसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या गृह संकुलात केवळ १०मिनिटे पिण्याचं पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र तक्रारी करूनही पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याने गृहसंकुलातील रहिवाशी त्रासले आहेत. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी थेट आगामी निवडणुकांमध्ये मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावरच रहिवाशांनी "पाणी नाही तर मतदान नाही" असा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.


पाणी प्रश्नाबाबत स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी या नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने जर लवकरच हा पाणी प्रश्न सोडवला नाही तर उपोषण करणार असल्याचं इशारा माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना