मिळणार भरघोस पैसा आणि यश; जाणून घ्या तुमची रास आहे का यात?
मुंबई : ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनुसार सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. एका वर्षामध्ये तो संपूर्ण राशी चक्र पूर्ण करतो. यावेळी सूर्य हा मीन राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे यादिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, म्हणूनच या महिन्याला खरमास म्हटले जाते. १३ एप्रिलला सूर्य मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार असून खरमासही संपणार आहे. त्याचसोबत काही राशींच्या आयुष्यातील वाईट दिवस संपणार आहे. यावेळी सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊ त्या राशी कोणत्या आहेत.
वृषभ
सूर्याचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात खूप फायदा दिसून येईल. प्रत्येक कामात यश मिळेल. या लोकांना चांगल्या कंपनीतून किंवा विदेशातून नव्या नोकरीची संधी मिळू शकते. उच्च पद आणि चांगला पगाराबरोबर या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल. यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटूंबातील लोकांचे आणि मित्रांचे या लोकांना सहकार्य लाभेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरू शकतात. या लोकांची करिअरमध्ये खूप प्रगती होईल. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना एक चांगले पद मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात या राशीच्या लोकांचा मान सन्मान सुद्धा वाढेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हे सूर्य गोचर खूप लाभदायक ठरेल. हे लोक आयुष्यात खूप प्रगती करणार. बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. करिअरमध्ये येणाऱ्या यांच्या अडचणी दूर होतील. हे लोक त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर चांगले काम करतील. यांना चांगल्या नोकरीची संधी सुद्धा मिळू शकते. वडिलांच्या मदतीने एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते. तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.