Fruits: तुम्ही जेवल्यानंतर फळ खाता का?

मुंबई: अनेकांना याबाबतीत शंका असते की फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे? फळे कधी खाल्ली पाहिजेत जेवणाआधी की जेवणानंतर? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज जाणून घेऊया की जेवणानंतर फळे खाल्ली पाहिजेत की नाही...


फळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटामिनसोबत कॅलरीजही असतात. मात्र अनेकजण कन्फ्युज असतात की फळे खाण्याची योग्य वेळ काय आहे...


आरोग्य तज्ञांच्या मते फळे जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी खाल्ली पाहिजेत. यामुळे शरीरास पोषण मिळते. जर तुम्ही फळे जेवणानंतर खात असाल तर शरीरात फळांमधील एक्स्ट्रा कॅलरीज जातात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.


त्यामुळे फळे जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेचच खाऊ नये. फळे खाण्याची योग्य वेळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असते. रात्री झोपण्याआधी फळांचे सेवन करू नये.


आरोग्य तज्ञ सांगतात की जेवणानंतर लगेचच फळे अजिबात खाऊ नयेत. खरंतर, जेवणाआधी शरीराला कॅलरीजची गरज असते जी जेवणादरम्यान पूर्ण होते. त्यामुळे त्यानंतर फळे खाल्ल्यास शरीरास अधिकची कॅलरी घ्यावी लागते. यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार अपचन, अॅसिडिटीचा त्रास होतो.

Comments
Add Comment

डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी आहे? आजच आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा!

मुंबई : डेंग्यू किंवा इतर काही संसर्गजन्य आजारांमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे ही गंभीर बाब ठरू

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी

वारंवार येणाऱ्या तापावर आयुर्वेदिक उपचार : गोकर्ण वनस्पतीचा काढा ठरतोय प्रभावी

मुंबई : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला, अंग दुखणे आणि ताप याचा त्रास होतो. पावसाळा,

कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे.

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती