Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीCholesterol: हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाची चिंता? मग 'हा' पदार्थ करेल कोलेस्ट्रॉलवर मात

Cholesterol: हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाची चिंता? मग ‘हा’ पदार्थ करेल कोलेस्ट्रॉलवर मात

केवळ कोलेस्ट्रॉलच नव्हे तर शरीर स्वास्थसाठी होतील याचे अनेक फायदे

मुंबई : वाढते शहरीकरण, आजचे धकाधकीचे जीवन, खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि कमी पौष्टिक आहार या गोष्टी सध्या तरुणांमध्ये दिसत आहेत. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे याचा परिणाम वृद्ध लोकांसह युवकांमध्ये होत आहे व त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे (High Cholesterol) प्रमाण वाढत आहे. कोलेस्टेरॉल हे हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचे कारण असून त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारा घेणे फार गरजेचे आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील हा पदार्थ तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी मदत करु शकतो.

प्रत्येक घरात स्वयंपाकात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. घरांमध्ये ‘नारळाची चटणी’ ही आवर्जून बनवली जाते. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार ही पांढरी नारळाची चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नारळाची ही चटणी सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याशिवाय रक्तदाब नियंत्रित करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पचन सुधारण्यासाही मदत मिळते. मात्र या चटणीत सॅच्युरेटेड फॅट असल्याने ती योग्य प्रमाणात सेवन करावी लागते. अन्यथा तिचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार नारळात जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ही नारळाची चटणी दररोज २-३ चमचे खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. त्याशिवाय या चटणीचं सेवन केल्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. नारळाच्या चटणीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ती आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते व शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत मिळते. इतकेच नव्हे तर हृदयाशी संबंधित आजाराचा धोकादेखील टळतो. अगदी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही नारळाची चटणी उपयुक्त ठरते. कारण या चटणीचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे वैज्ञानिकांनुसार फायबर भरपूर असलेल्या नारळाच्या चटणीने हाय कोलेस्ट्रॉलने हैराण असणाऱ्या लोकांना मदत मिळू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -