वॉशिंग्टन : काल मुस्लीम समुदायाचा ईद – उल – फित्र अर्थात रमझान ईद हा सण साजरा करण्यासाठी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे जमलेल्या लोकांवर गोळीबार झाला. या घटनेत ३ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका १५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांना या मुलाकडे एक बंदूक सापडली.
फिलाडेल्फियामधील क्लारा मोहम्मद स्क्वेअर येथील मशिदीजवळ गुरुवारी (भारतीय वेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता) रमजान उत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अंदाजे एक हजार लोक उपस्थित होते. अचानक दोन गटांमध्ये गोळीबार सुरू झाला. गोळीबाराचा आवाज येताच चेंगराचेंगरी झाली.
लोक जवळच्या पार्क, शाळा आणि मशिदीकडे धावू लागले. गोळीबार टाळण्यासाठी काही लोक झाडांच्या मागे लपले. सुमारे ३० गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या. यात १५ वर्षीय संशयितासह एक पुरुष आणि एक मुलगी जखमी झाली. गोळीबार करणाऱ्या गटांची माहिती आणि गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…