Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीVijay Vadettiwar : अशोक चव्हाणांचा राईट हँड असलेले विजय वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये...

Vijay Vadettiwar : अशोक चव्हाणांचा राईट हँड असलेले विजय वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार!

विदर्भातील एका मोठ्या नेत्याचा दावा

मुंबई : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे महायुतीची (Mahayuti) ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे, जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) नाराजीनाट्य सुरु आहे. काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray Group) अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचं चित्र आहे. त्यात काँग्रेसचे नेते प्रचंड नाराज असून अनेक नेते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच विदर्भातील एका मोठ्या नेत्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) लवकरच भाजपामध्ये जाणार, असा दावा केला आहे. हे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram).

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, ‘विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे राइट हँड आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील तसेच नजीकचे मानले जाणारे अनेक नेते भाजपामध्ये गेले आहेत. ही एक प्रकारची सूचक दिशा आहे की, विजय वडेट्टीवार हे भाजपामध्ये जाणार आणि ही गोष्ट १०० टक्के खरी आहे’, असा मोठा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

‘विजय वडेट्टीवार भाजपामध्ये जाण्यासंदर्भात ज्या काही बैठका, चर्चा झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार भाजपामध्ये नक्की जाणार’, असे आत्राम यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, ‘या बैठकांबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र, तेही होते आणि मीही होतो, एवढंच सांगेन. या सगळ्या चर्चा माझ्यासमोर झाल्या. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून काय करणार, तेही भाजपामध्ये जाणार’, असे आत्राम यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे आता मविआमध्ये आणखी काय काय उलथापालथी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -