भाजपा नेते आशिष शेलार यांचा कवितेच्या माध्यमातून खोचक टोला
मुंबई : लोकसभा निवडणुकांना सुरुवात होताच भाजपा नेते अनंतकुमार हेगडे यांनी ४०० पार बहुमत आले की, संविधान बदलणार असे जाहीरपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागाराने संविधान बदलले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र नाना पटोले यांच्या टिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
“काय झाडी… काय डोंगर… एकदम सगळं कसं ओके… काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !” असं म्हणत आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “काय झाडी..! काय डोंगर…!! महायुतीमध्ये एकदम ओके..! आघाडीत एकमेकांना एकमेकांचेच धोके ! वर्षानुवर्षे काँग्रेसला काँग्रेसनेच हरवलं, त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचं ठरवलं. या गटाच्या मैत्रीला तर दुष्मनाची ही नाही येणार सर, ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर!”
“साहेबांच्या गटाची तर काय सांगावी ख्याती? गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार आपली ताई आणि आपली बारामती!! काय झाडी… काय डोंगार… एकदम सगळं कसं ओके… काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !” असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
चुकलेत आमच्या नानांचे ठोके!
काय झाडी..!
काय डोंगार…!!
महायुतीमध्ये
एकदम ओके..!
आघाडीत एकमेकांना
एकमेकांचेच धोके!वर्षानुवर्षे काँग्रेसला
काँग्रेसनेच हरवलं
त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचे ठरवलं
या गटाच्या मैत्रीला तर
दुष्मनाची ही नाही येणार सर
ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर !…— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 11, 2024