नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. तसेच सक्तवसुली संचालनालयाकडून केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली. या कोठडी विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र त्यावेळी न्यायालयाने पुरेश्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना अटक केल्याचे सांगितले आणि त्यांची याचिका फेटाळून लावली.
त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापले जाणार नाही. तसेच या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचा युक्तीवाद ॲड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केल्यानंतर तुम्ही याचिकेच्या संदर्भात ई–मेल केला आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली.
दरम्यान, त्यांच्या विरोधात ३५ ते ४० खटले सुरु आहेत. खटल्यांच्या अनुषंगाने वकिलांशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे, असे अरविंद केजरीवाल यांचे वकील विकी जैन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटता येण्याची परवानगी द्यावी, ही याचिका अरविंद केजरीवाल यांनी राउज अव्हेन्यू न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार, कोर्टाने त्यांच्या वकिलाला आठवड्यातून दोनदा भेटता यावे अशी परवानगी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगामध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह यांनी केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.
एखादी व्यक्ती तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय निवडत असेल तर त्याला अपवाद मानले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीला विशेषाधिकार दिले जाऊ शकत नाहीत, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. बैठकांचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जाऊ शकतो, असे देखील सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…