आगरदांडा अदानी पोर्टच्या रेल्वे भू-संपादन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध!

मुरूड(प्रतिनिधी संतोष रांजणकर) - अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणाऱ्या रेल्वे भू-संपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबा-यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा.आदी.मागण्यासह विरोध दर्शवित आज मोजणी होऊ दिली नाही.

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकऱ्यांना आज दि.१० एप्रिल रोजी आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती.त्यानुसार सकाळी ९.३० वा.प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते.


त्याप्रमाणे आज आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबा-यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा.अशी मागणी करत मोजणी होऊ दिली नाही.

यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेख चे निमतानदार एम.पी.पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर,यूसुफ अर्जबेगी, संतोष पाटील, आशिष नरेंद्र हेदूलकर,अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी,नजीर खतीब,तहसिन बशीर फकी,इमुद्दीन कादिरी,अहीर,मुब्बशिर खतीब शेतकरी उपस्थित होते.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि