RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बॅंकेतील खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी

  59

मुंबई : आरबीआयने (RBI) नुकतीच आयडीएफसी फस्ट बँकेवर (IDFC First Bank) तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही (LIC Housing Finance) मोठी कारवाई करुन दंड ठोठावला होता. त्यानंतर आता लगेचच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर (Shirpur Merchants Co-Operative Bank ltd) देखील आरबीआयने कारवाई केली आहे. या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक करता येणार नाही. तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


आरबीआयच्या कारवाईनुसार शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. दरम्यान, या बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात ५लाख रुपयापर्यंत रक्कम आहे, त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात.


Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात