वाशी सानपाडा-तुर्भे येथे गुढीपाडवा शोभायात्रां संपन्न

नवी मुंबई(प्रतिनिधी) - वाशी, सानपाडा, तुर्भे परिसरात विविध संस्थांच्या वतीने गुढीपाडवा शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने तुर्भे गाव येथे गुढी पाडवा उत्सवा निमित्ताने गुढी उभारून तुर्भे गाव पंचक्रोशीत पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर अखंड रामनाम गजर, रामरक्षा सहस्त्रावर्तने, अखंड रामनाम, हरिपाठ, शांता महिला मंडळाच्या वतीने भजन सादर केली.

नवदुर्गामाता चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुर्भे स्टोअर परिसरामध्ये नववर्ष सद्भावना कलश यात्रा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भागवत कथाकार शामा प्रसाद तिवारी यांची उपस्थिती होती.


अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी श्री गणेश मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेसाठी १०० कलाकार सहभागी झाले होते. तसेच स्थानिक महिला वर्गाचे लेझीम व कोळी नृत्य व पारायण मंडळ मधील वारकरी यांचे सादरीकरण करण्यात आले.यामध्ये प्रमुख आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज व मावळे, ढोल ताशा,आदिवासी समुह, धनगर समुह, वासुदेव, प्रभु श्रीराम लक्ष्मण सिता व हनुमान , पालखी अबदागीरी, चित्ररथ होते.


श्री नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट वाशी ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी यात्रेच्या वतीने पारंपरिक वेशात टाळ मृदुंगाच्या तालात जागृतेश्वर शिव मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुढी पाडवा, हिंदू नवं वर्ष शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


या शोभायात्रेत स्री पुरुष लहान मुले व वारकरी संप्रदायातील लोक सहभागी झाले होते सलग गेली २२ वर्ष हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख ह.भ.प.डॉ.निलेश महाराज शास्त्री यांनी शास्त्रोक्त मंत्र म्हणून गुढीची उभारणी केली . गुढी पूजन माजी वॉर्ड अध्यक्ष बाळकृष्ण पाटील व ह भ प भगवान महाराज भोईर यांनी सपत्नीक केले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप खंडेराव भोईर , ह भ प बाळकृष्ण महाराज भोईर , हभप भास्कर महाराज म्हात्रे , कृष्णा भोईर ,रामनाथ म्हात्रे , महेश कुलकर्णी , निलेश प्रव्हाणे ,सुधाकर पाटील , संजय भोईर , दिलीप पाटील व हरिपाठ मंडळ व आरती मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे