Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीPradeep Sharma : प्रदीप शर्मा यांच्या हायकोर्टाच्या जन्मठेपेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांच्या हायकोर्टाच्या जन्मठेपेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या आदेशाला (Life Imprisonment) पुढील निर्देश देईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

प्रदीप शर्मा यांनी निकालाला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.

लखन भैय्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत शरण येण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. लखन भैय्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा यांची दोषमुक्ती रद्द करत उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी तहकूब केली आहे.

लखन भैया कथिक एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने १९ मार्च २०२४ रोजी निर्णय देत प्रदीप शर्मा यांना दणका दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची दोष मुक्ती रद्द करत दोषी आढळल्याचे सांगत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २००६ च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणी आता पुढील सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. तोपर्यंत राज्य सरकारला या संदर्भातील उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे मांडावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -