Pushpa 2 teaser out : डोळ्यांत आग, पायांत घुंगरु, गळ्यात लिंबाची माळ, अर्धनारीच्या रुपात पुष्पाचा रुद्रावतार!

  95

अल्लु अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २ : द रुल’चा खतरनाक टीझर आऊट


मुंबई : अभिनेता अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाने गेल्यावर्षी धुमाकूळ घातला. त्यातली गाणी, पुष्पाच्या अॅक्शन्स, रश्मिकाच्या डान्स स्टेप्स सर्व काही सुपरहिट ठरलं. यानंतर आता प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत ते ‘पुष्पा २ : द रुल’च्या (Pushpa 2 : The Rule) रिलीजची. प्रदर्शनासाठी अजून ४ महिने बाकी असतानाही प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे. ५ एप्रिलला रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त श्रीवल्लीचा पुष्पा-२ मधील पहिला लूक रिलीज करण्यात आला. यानंतर आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे. ज्याला अवघ्या एका तासातच २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे व्ह्यूज वेगाने वाढत आहेत.


पुष्पामधील अल्लुचा हटके अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरला. त्याचा एक पाय सरकवत चालण्याची स्टाईल, हनुवटीजवळून हात फिरवणं याची तर तरुणाईमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. यानंतर आता ‘पुष्पा २ : द रुल’ मध्येही अल्लु एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. त्याचा टीझरमधील तो रुद्रावतार पाहून अनेकांनी अंगावर शहारे आल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.



अल्लु अर्जुन या टीझरमध्ये चक्क विविध भरजरी दागिने, साडी नेसून, गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके घालून अवतरला आहे. चेहऱ्यावर रंगरंगोटी करून हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या संपूर्ण १ मिनिट ८ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एकही संवाद ऐकायला मिळत नाही. सगळं लक्ष अल्लू अर्जुनवर केंद्रीत करण्यात आलं आहे. ‘पुष्पा २’ मध्ये प्रेक्षकांना भरभरून अ‍ॅक्शन पाहायला मिळेल हे टीझरमुळे स्पष्ट झालं आहे.





दरम्यान, अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी आपला ४२ वा वाढदिवस (Allu Arjun Birthday) साजरा करत आहे. याच खास प्रसंगी पुष्पा २ चा टीझर चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वांनी माझ्या वाढदिवशी भरभरुन दिलेल्या प्रेमामुळे हा टीझर म्हणजे माझ्याकडून एक रिटर्न गिफ्ट आहे, अशा भावना अल्लु अर्जुन सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. बहुचर्चित ‘पुष्पा २’ यावर्षी १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक