नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्टेशन वर पंखे लावण्याची मागणी

नवी मुंबई(प्रतिनिधी) - सुनियोजित अश्या सिडकोच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवर पंखे नसल्याने, उन्हाच्या झळांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठीं मेट्रो रेल्वे स्टेशनवर.पंखे बसविण्यात यावे अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी' यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक याच्याकडे केली आहे.


सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अतिशय सुनियोजित बनविण्यात आला असून प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे या वर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने प्लॅटफॉर्मवर फॅन नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे रहाणे मुश्किल झाले आहे विशेष म्हणजे प्रवाशी प्लॅटफॉर्मवर काही मिनिटेच मेट्रो ची प्रतीक्षा करत असतात त्यामुळे प्रवाशी कशी बशी वेळ काढून जातात.


परंतु प्रवाशाच्या सुरक्षे करिता प्लॅटफॉर्मवर नेमणुकीस असलेले सुरक्षा रक्षक है २४ तास जुटीवर असतात फॅन नसल्याने अधिक उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली आसता काही क्षणाकरीता नविलाजास्त्व मेट्रोच्या एसीचा आधार घ्यावा लागत आहे या सर्वाचा आदरणीय महोदयांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक मेट्रो स्थानकावर फॅन बसविण्यात येऊन प्रवाशी व सुरक्षा रक्षकांना दिलासा द्यावा असे.कासमभाई मुलाणी'यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे केली आहे.

Comments
Add Comment

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा

फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या