नवी मुंबई(प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्तानेभाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील क्र. ६५ वाशीगाव व प्रभाग क्र ७७, ७८ सानपाडा येथे विविध उपक्रम आयोजन करण्यात आले .
देशभरातील सर्व कार्यकर्ते पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करतात आणि पक्षाच्या विचारधारेसाठी दृढनिश्चयाने काम करतात. देशातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा निश्चय केला आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, गरीब, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक कामे केली गेली आहेत, तर पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे आणि अद्वितीय कार्य केले गेले आहे. भारताचा सन्मान, संस्कृती आणि वारसा वृद्धिंगत केला आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण होताना देशाला दिसत आहे आणि संपूर्ण देश मोदीमय झाला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जगत प्रकाश नड्डाजी आणि प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मा. संदिपजी गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार, पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माजी विरोधी पक्षनेते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दशरथजी भगत यांच्या मार्गदर्शना खाली माजी नगरसेविका वैजयंती भगत, निशांत भगत व समाजसेवक संदिप करसन भगत यांनी प्रभाग क्र. ६५ वाशीगाव व प्रभाग क्र ७७, ७८ सानपाडा येथे खालील उपक्रमांचे आयोजन करून भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला.
वाशीगाव येथील पक्ष जनसंपर्क कार्यालयावर पक्षाचा झेंडा फडकावून उपस्थितांना मिठाई व फळे वाटप करण्यात आले. पक्षीय स्थापना दिनानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. बूथ स्तरावर लाभार्थ्यांशी विशेष संपर्काचा कार्यक्रम आणि मोदी सरकारच्या कामगिरीची व्यापक चर्चा पक्ष कार्यालयात करण्यात आली. पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि विकास तसेच मोदी सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीची चर्चा घडवून आणली.
आगामी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये भारतीय जनता पक्षाचाच विजय निश्चित करण्यासाठी तिन्ही प्रभागातील कार्यकर्ते निर्धाराने काम करीत आहेत. ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अबकी बार 400 पार’ या आव्हानासह अथक परिश्रम करत आदरणीय नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प एकजुटीने करण्याचा पुनःश्च एकदा निर्धार करण्यात आला.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…