समान नागरी कायदा नको पण समलैंगिक संबंध हवेत; उबाठाला कॉंग्रेसचा जाहिरनामा मान्य आहे का?

शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांचा सवाल


मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी समान नगरी कायदा व्हायला हवा, असे ठणकावून सांगितले होते. पण काँग्रेसने जाहीरनाम्यात पर्सनल लॉ कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. समान नागरी कायद्याला विरोध आणि समलिंगी कायद्याचे समर्थन करणारा कॉंग्रेसचा जाहीरनामा उबाठा गटाला मान्य आहे का? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे खुले आव्हान शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज दिले.


शिवसेना पक्षाचे कार्यालय बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठा गटावर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर घेऊन जाण्याची ज्यांची लायकी नाही, त्यांना तिथे घेऊन गेलात आणि शिवतीर्थावर हिंदुत्वाचा उच्चार करु शकला नाहीत. बाळासाहेबांच्या ध्येय धोरणांचा तत्वांचा जर अपमान होत असेल तर उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू नये, बाळासाहेबांच्या फोटोवर त्यांनी मते मागू नयेत, अशी टीका पावसकर यांनी केली.


भाजप स्थापना दिनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर बोलताना पावसकर म्हणाले की, विकास कामांच्या जोरावर डॉ.श्रीकांत शिंदे भरघोस मतांनी निवडून येतील. त्यांना आजोबा आणि वडिलांचे नाव सांगत फिरावे लागणार नाही. डॉ. श्रीकांत शिंदे हे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे, तुमच्या सारखा लुच्चा नाही असा प्रतिहल्ला पावसकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला. आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून लढण्याची घोषणा केली होती. त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी असे प्रतिआव्हान पावसकर यांनी दिले.

नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या मतदारसंघाचे निर्णय महायुतीचे सर्वोच्च नेते लवकरात लवकर घेतील. नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी पावसकर यांनी केला.

Comments
Add Comment

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी