Ghatkopar to Versova Metro : तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात मेट्रोने केले प्रवाशांचे हाल

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो धावतायत १५ ते २० मिनिटे उशिरा


मुंबई : उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना अनेकजण एसी लोकल किंवा मेट्रोचा पर्याय निवडतात. मात्र, गर्दीच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा काही काळ रखडली होती. आता ही सेवा पूर्ववत झाली असली तरी सर्व मेट्रो १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे.


घाटकोपर-वर्सोवा ट्रेन सेवेमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला होता. यावेळी काही काळासाठी मेट्रो सेवा पूर्णपणे रखडली होती. त्यामुळे मुंबईकरांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले. मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगितलं. यानंतर काही वेळाने रखडलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली.



काही प्रवासी मेट्रोमध्ये अडकून होते


सकाळी ऑफिस आणि कॉलेज किंवा इतर कामानिमित्त लोकल आणि मेट्रो प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रखडली आणि यामुळे अनेक प्रवाशांची वाताहत झाली. सकाळी मेट्रो काही काळासाठी रखडली होती, त्यामुळे प्रवासी बराच वेळ मेट्रोमध्ये अडकून होते. अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला उशिर झाला.

Comments
Add Comment

Abhijit Bangar : खड्ड्यांच्या प्रत्येक तक्रारीचे २४ तासांच्या आत निराकरण 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश मुंबई :  महानगरपालिका (BMC) हद्दीतील

BEST Strike : 'बेस्ट' संपावर तातडीने तोडगा काढून 'नीट' परीक्षार्थींना दिलासा द्या

माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी मुंबई,  : गुरुवारच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या

Nitesh Rane : आदित्य ठाकरे 'उबाठा'चा अभिषेक बॅनर्जी!

 मंत्री नितेश राणेंचा टोला; 'महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांना हेल्मेट पाठवणार' मुंबई : "उबाठा गट काँग्रेसमध्ये

Navnath Ban : संजय राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगायला हवा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी

BMC : नाना शंकर शेठ यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे स्मारक उभारा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि

PM Narendra Modi : PM मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा शुभारंभ होणार; मुंबई आणि नागपूरच्या EPFO कार्यालयात विशेष कार्यक्रम होणार

मुंबई : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या (Central Government)