नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस खासदार डॉ. मनमोहन सिंह(manmohan singh) आता संसदेचे उच्च सदन राज्यसभेत दिसणार नाहीत. असे यासाठी कारण ते ३३ वर्षांनी रिटायर होत आहेत. बुधवारी ३ एप्रिलला त्यांच्या दीर्घ आणि शानदार संसदीय खेळीची सांगता होईल. आर्थिक सुधारणांचे सूत्रधार मानले जाणारे ९१ वर्षीय मनमोहन सिंह ऑक्टोबर १९९१मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले होते. ते १९९१ ते १९९६ दरम्यान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थ मंत्री आणि २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते.
खास बाब म्हणजे एकीकडे त्यांची ही खेळी संपत असताना काँग्रेसच्या सोनिया गांधी पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचत आहेत. सोनिया गांधी पहिल्यांदा राजस्थानातून राज्यसभेत प्रवेश करतील. तर मनमोहन सिंह यांच्यासह राज्यसभेतून कमीत कमी ५४ सदस्यांचा कार्यकाळ मंगळवारी आणि बुधवारी समाप्त होईल. यातील काही राज्यसभेत परतणार नाहीत.
केंद्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, पशुपालन आणि मस्यपालन मंत्री परषोत्तम रूपाला, सूचना प्रोद्योगिक राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर, परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म-लघु आणि मध्य उद्योग मंत्री नारायण राणे, सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांचा राज्यसभेचा कार्यकाल मंगळवारी पूर्ण झाला.
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाल बुधवारी समाप्त होईल. अश्विनी वैष्णव सोडून हे सर्व केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणूक लढवत आहे ज्यांना राज्यसभेत आणखी एक कार्यकाल देण्यात आलेला नाही.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…