World Cup 2011: टीम इंडियाने आजच्याच दिवशी जिंकला होता वनडे वर्ल्डकपचा दुसरा खिताब

Share

मुंबई: टीम इंडिया(team india)ने आजच्याच दिवशी म्हणजेच २ एप्रिल २०११ रोजी फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत वनडे वर्ल्डकपचा(oneday world cup) दुसरा खिताब जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे वर्ल्डकप २०११(ODI World Cup 2011) चा खिताब आपल्या नावे केला होता. गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि कर्णधार धोनीची नाबाद ९१ धावांच्या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला होता.

मुंबईच्या वानखेडे मैदानावरील धोनीचा तो विजयी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या ठणठणीत लक्षात आहे. या विजयासोबतच तब्बल २८ वर्षांनी भारताने पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप हातात घेतला होता. याआधी १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०११मध्ये धोनीच्या धुरंधरांनी २८ वर्षांनी या खिताबावर आपले नाव कोरले होते.

 

या सामन्यात कर्णधार धोनीला प्लेयर ऑफ दी मॅचने सन्मानित करण्यात आले होते. तर युवराज सिंह प्लेयर ऑफ दी सीरिज ठरला होता. हा वर्ल्डकप अविस्मरणीय असाच आहे. यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला कोणताही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

असा रंगला होता फायनलचा सामना

वानखेडे मैदानावर फायनल सामन्यात श्रीलंका पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली होती. त्यांनी ५० षटकांत ६ विकेट गमावत २७४ धावा केल्या होत्या. संघासाठी महेला जयवर्धनेने ८८ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती. याशिवाय कुमार संगकाराने ६७ बॉलमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४८.२ षटकांत विजय आपल्या नावे केला होता. संघासाठी गौतम गंभीरने १२२ बॉलमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ९७ धावांची मोठी खेळी केली होती. याशिवाय धोनीने ७९ बॉलमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. धोनीसोबत युवराज सिंहने २४ बॉलमध्ये २ चौकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या होत्या.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago