Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरु

Share

पाहा कोणते उमेदवार भरणार अर्ज?

मुंबई : लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु झाले आहे. आज अनेक महत्वाच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

  • महायुतीच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीचे चर्चेचे गुऱ्हाळ आणि खलबते सुरू असतानाच, आज महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. (Sanjay Deshmukh, Yavatmal-Washim Lok Sabha Constituency)
  • बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता हजारो शेतकऱ्यांच्या सभेला तुपकर संबोधित करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच शेतकऱ्यांच्या साक्षीने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचं महायुतीचा उमेदवार म्हणून, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Ravikant Tupkar and Prataprao Jadhav, Buldhana Lok Sabha Constituency)
  • वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हासाठी माजी आमदार अमर काळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. (Amar Kale, Wardha Lok Sabha Constituency)
  • परभणी लोकसभा मतदारसंघात काल महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आज महाविकास आघाडीकडून उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव हे अर्ज दाखल करणार आहेत. (Sanjay Jadhav, Parbhani Lok Sabha Constituency)

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

5 seconds ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 minute ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

26 minutes ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

50 minutes ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

55 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

1 hour ago