Thursday, May 8, 2025

ताज्या घडामोडी

Dharavi Redevelopment: धारावीत अंतिम डेटा गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू

Dharavi Redevelopment: धारावीत अंतिम डेटा गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू

पहिल्या दिवशी ५० झोपड्यांचे सर्वेक्षण


मुंबई : धारावी हे एक शहरी पुनरुत्थानाचे मॉडेल व्हावे या दिशेने आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाने दुसरे मोठे पाऊल टाकले. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अंदाजे ५० झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. कमला रमण नगरमधील साक्षी सावंत यांच्या सदनिकेपासून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पासाठी १८ मार्च रोजी प्रत्येक झोपडीला युनिक नंबर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर लेन्सचे, लेसर मॅपिंग केले गेले. प्रत्येकी पाच सदस्यांच्या, पाच पथकांनी सदनिकाधारकांच्या निवासस्थानांना किंवा व्यावसायिक आस्थापनांना भेट दिली. येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला गती देण्यासाठी तैनात केलेल्या पथकांची संख्या वाढवली जाणार आहे.

सर्वात जुनी आणि नवीनतम वीज बिले, मतदार ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, गुमास्ता परवाना आणि बीएमसीने जारी केलेला हॉटेल परवाना यासारख्या कागदपत्रांच्या स्व: साक्षांकित छायाप्रती सर्वेक्षणादरम्यान गोळा केल्या. मूळ कागदपत्रे स्कॅन करून जागेवर सदनिकाधारकांना परत करण्यात आली.
Comments
Add Comment