Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीAyushman Khurrana : लोकसभा निवडणुकीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्विकारली 'ही' मोठी जबाबदारी!

Ayushman Khurrana : लोकसभा निवडणुकीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्विकारली ‘ही’ मोठी जबाबदारी!

म्हणाला, ‘मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण…

मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांतून दर्जेदार काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव हमखास घेतलं जातं. मनोरंजनासोबतच आयुष्मानने आता एक मोठी जबाबदारी स्विकारली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Elections) तो एक महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. निवडणुकीत लोकांनी मतदान करावं यासाठी तो समाजप्रबोधन (Social Awareness) करणार आहे. आयुष्मान खुरानाचा पोस्ट केलेला लेटेस्ट व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे.

मतदारांना जागरुक करण्यासाठी, निवडणुकीसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुराना निवडणूक आयोगाच्या (Election Commission) व्हिडिओमध्ये दिसला. २०२४ लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची निवड केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.

आयुष्मान म्हणाला, ‘मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण…

मतदान न करण्याचे अनेक बहाणे आहेत आणि आयुष्मान याच कारणांबद्दल भाष्य करताना दिसला. एक मतही दिले नाही तर काय होईल, असंही तो उपहासात्मक पद्धतीने म्हणताना दिसला. तो पुढे म्हणाला की, ‘मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.’

‘प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्त्वाचे’

आयुष्मानने पुढे असे म्हटले की, ‘प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जागरूक नागरिक बनले पाहिजे. संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आपल्या गरजांचे प्रतिनिधित्व करणारे नेते निवडून आणण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात मतदान हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.’ आयुष्मानच्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक मतदारांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांची मतं मांडली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -