Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता तुला चपलेने मारल्याशिवाय गप्प राहणार नाही!

सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोलतात


प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अत्यंत बेताल वक्तव्यं करीत आहेत. गेले काही दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप नेत्यांवर आपले टीकास्त्र उपसले आहे. त्यामुळे भाजप नेतेही त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत तर पंतप्रधान मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी (Johnny Lever) करत हद्द पार केली. राऊतांच्या या टीकेवर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राऊतांचा उल्लेख 'नटरंगी नाचा' असा करत जोरदार हल्लाबोल केला.


प्रसाद लाड म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील १३० कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातं, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातो, असं प्रसाद लाड म्हणाले. तसंच संजय राऊत यांना उद्देशून 'अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,' असं प्रसाद लाड म्हणाले.


पुढे प्रसाद लाड म्हणाले, संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला सांगतो तुला मी सोडणार नाही, असा इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला.


Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम