मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईच्या दौर्यावर येत असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर नेहमीप्रमाणे टीका केली. गेले काही दिवस संजय राऊत सातत्याने पंतप्रधानांवर करत असलेल्या टीकांमुळे भाजप नेते त्यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. त्यातच आजच्या पत्रकार परिषदेत भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यांवरुन त्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘संजय राऊतने कितीही नाक रगडलं, शेंबड्यासारखं रडला तरीही त्याच्या भुंकण्याला कोणीही महत्त्व देत नाही’, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी लगावला.
नितेश राणे म्हणाले, आज आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे. या दौर्यावर आज सकाळी संजय राऊतने अपेक्षेप्रमाणे अकलेचे तारे तोडले. त्याने एक नवीन जावईशोध असा लावला आहे की, आदरणीय पंतप्रधान यांचे दौरे, त्यांची सुरक्षितता हा सगळा आचारसंहितेच्या नियमांचा भंग आहे. हे पंतप्रधानच नाही तर काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करुच शकत नाहीत, असा जावईशोध त्याने लावला आहे.
ज्याने साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही, लोकांमध्ये कसं निवडून यायचं याचा ज्याला थांगपत्ता नाही, ताकद नसल्याने ईशान्य मुंबईची जागा लढवण्याचा देखील विचार केला नाही तो संजय राजाराम राऊत निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीची आचारसंहिता काय असते, याबाबत आम्हाला ज्ञान देतो आहे. देशाचे पंतप्रधान कोणतेही नियम तोडत नाही आहेत. आचारसंहिता असल्यावर देखील त्यांच्या सुरक्षिततेचा प्रोटोकॉल हा तसाच राहतो, त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईपर्यंत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबच असणार आहेत. म्हणून याने कितीही नाक रगडलं, शेंबड्यासारखं रडला तरीही त्यांच्या भुंकण्याला कोणीही महत्त्व देत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
केजरीवालांसाठी कार्यक्रम घेत असल्याचं सांगून काल इंडिया आघाडीच्या पूर्ण कार्यक्रमात साधा केजरीवालांचा बॅनर देखील या लोकांनी काढायला लावला. त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती, ती राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली. इलेक्टोरल बाँडची जी चर्चा सकाळी संजय राऊत करत होता, मग उबाठाला जे बाँडच्या रुपाने पैसे आले आहेत, त्याची पण चर्चा झाली पाहिजे. ज्या लोकांनी उबाठाला बाँडच्या रुपात पैसे दिले आहेत, त्यांना कोविडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महापालिकेचे किती टेंडर मिळाले आहेत, याची पण चर्चा व्हावी, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं.
काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला. त्यांचं म्हणणं आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरमध्ये पाठवण्यासाठी ते स्वतः खर्च करणार आहेत. ज्याने उभ्या आयुष्यात स्वतःच्या गोष्टींसाठीही कधी स्वतःचा पैसा खर्च केला नाही, स्वतःच्या खिशातून एक रुपया काढण्याची ज्यांना सवय नाही तो देवेंद्रजींचा मणिपूरमध्ये जाण्याचा खर्च उचलण्याच्या बाता करतोय.
उद्धव ठाकरेंनी ‘मणिपूर फाईल्स’वर बोलण्याआधी ‘दिशा सालियन फाईल्स’ हा चित्रपट काढावा. तो खूप चालेल. मुख्य भूमिकेत तुमच्या मुलालाच घ्या, कारण तोच या कथेचा मुख्य सूत्रधार आहे. संजय राऊतला सांगेन की तुला जर कोणता चित्रपट काढायचा असेल तर ‘गोरेगावच्या रॉयल पार्क फाईल्स’ किंवा ‘न्यूझीलंड हाऊस फाईल्स’ या नावाचे चित्रपट काढू शकतोस, म्हणजे लोकांचं किती मनोरंजन होतंय ते कळेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…