मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL 2024) १७व्या हंगामात आज मुंबई इंडियन्सचा(MI) सामना राजस्थान रॉयल्सशी(RR) होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने गमावले आहे. आता हा त्यांचा तिसरा सामना आहे. हंगामात पहिल्यांदा मुंबई आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत आहे.
दुसरीकडे राजस्थानचा संघ लयीमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा सामना करणे मुंबईसाठी आव्हानात्मक असणार आहे. सोबतच कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदा घरच्या मैदानावर मुंबईच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. इतर दोन स्टेडियममध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.
मुंबईविरुद्ध सनरायजर्स हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या
मुंबईला आयपीएलमध्ये धीम्या गतीने सुरूवात करणारा संघ म्हणून ओळखले होते आणि पांड्याला कर्णधार बनवल्यानंतरही यात काही बदल झालेला नाही. मुंबई इंडियन्सला पाच वेळा खिताब जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या जागी या हंगामात पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी पराभव सहन करावा लागला. यानंतर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तर मोठा इतिहास रचला गेला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या साकारली. या सामन्यात मुंबईला ३२ धावांनी पराभव सहन करावा लागला. या दोन पराभवानंतर मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात खाली १०व्या स्थानावर आहे.
दरम्यान, आयपीएलच्या १७व्या हंगामाची सुरूवात आहे. मात्र मुंबईला विजयाची लय ही गाठावीच लागेल त्यासोबतच नेट रनरेटही सुधारावा लागेल. मुंबईला आपला अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवची कमतरता जाणवत आहे. तो दुखापतीतून सावरत आहे.
राजस्थान-मुंबईंचे संघ
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, गेराल्ड कोएत्जी, टिम डेविड, श्रेयस गोपाल, ईशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी , नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णु विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठौड़, नंद्रे बर्गर, नवदीप सैनी, रवीचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोवमॅन पॉवेल, टॉम कोहलर-कैडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायसवाल, युझवेंद्र चहल आणि तनुष कोटियान.