
मुंबई: उन्हाळा सुरू होताच लोक थंड खाणे-पिणे सुरू करतात. यातील सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे आईस्क्रीम. लहान असो वा मोठे प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते. जेव्हा कमी वयाची मुले दररोज आईस्क्रीमचे सेवन करतात तेव्हा हा चिंतेचा विषय ठरतो. तुम्हीही या समस्येने ग्रस्त आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
छोट्या मुलांसाठी आईस्क्रीम धोकादायक बनू शकते. आईस्क्रीमची सवय सोडवणे आई-वडिलांसाठी खूप कठीण असते.
करा हे सोपे उपाय
मुलांची आईस्क्रीम खाण्याची सवय सोडवण्यासाठी जेव्हा ही मुलांना आईस्क्रीम खावेसे वाटेल तेव्हा त्यांच्यासमोर दही, स्मूदी, फळे यांच्यासारख्या गोष्टी ठेवा. घरी चुकूनही आईस्क्रीम ठेवू नका. याशिवाय जर मुले तुमच्याकडून पैसे मागत असतील तर या बदली घरात फळे, ड्रायफ्रुट्स देऊ शकता.
मुलांसाठी धोकादायक आहे आईस्क्रीम
मुलांसाठी आईस्क्रीमचे सेवन अतिशय धोकादायक आहे. यातील साखर तुमच्या मुलांचे दात खराब करू शकतात. यातील कॅलरीज अधिक असतात ज्यामुळे लहान मुलांमध्ये कमी वयात लठ्ठपणा दिसू शकतो. याशिवाय दररोज आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी,खोकल्यासारख्या समस्या होऊ शकतात.