Amruta Khanvilkar: आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे!

यशाच्या शिखरावर असलेल्या अमृता खानविलकरने व्यक्त केली 'ही' इच्छा



मुंबई : 'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर हिने अथक परिश्रमाने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही तिने स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. 'राझी', 'सत्यमेव जयते' आणि 'मलंग' या चित्रपटांमध्ये तिने महत्तवपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या अमृता खानविलकर हिची लुटेरे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमधील तिनं साकारलेली "अविका " ही भूमिका प्रेक्षकांना वेड लावतं आहे. लुटेरे वेब सीरिजनंतर आता अमृताने तिला पुढे काय करायचंय? याबद्दल प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे. ही खास गोष्ट नक्की काय आहे? हे बघायला सगळेच उत्सुक आहेत.


प्रत्येक कलाकाराला अभिनयाच्या पलिकडे काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतचं. अमृता खानविलकर हिच्या बाबतीतही असेच काहीस आहे. अमृता सध्या "लुटेरे" चं प्रमोशन करत आहे. अशाच एका प्रमोशन दरम्यान अमृताने तिला आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे याबद्दल सांगितल.


विशेष म्हणजे ही हरहुन्नरी अभिनेत्री फक्त अभिनय आणि नृत्यातच पारंगत आहे असं नाही तर अमृता अभ्यासातही कोणाच्या मागे नव्हती. शिक्षणाबद्दल सांगताना अमृता म्हणते, "अभिनय नवनवीन भूमिका प्रोजेक्ट्स सगळंच होत राहणार आहे पण मला अभिनयाच्या सोबतीने मास्टर्स सुद्धा करायचं आहे. मास्टर्स इन लिटरेचर किंवा इन फायनान्स हे अजून ठरवलं नाही पण मास्टर्स करण्याची माझी इच्छा आहे. आपण वर्षभर काम करत असतो पण स्वतः साठी काहीतरी करावं म्हणून मला मास्टर्स करण्याची खूप इच्छा आहे" असे अमृता हिने सांगितले.


अमृता हि आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. "कलावती " , " ललिता बाबर "पठ्ठे बाबूराव" अशा चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण आता लुटेरेनंतर अमृता तिचं उच्च शिक्षण पूर्ण करणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे