मुंबई : ‘आदरणीय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल एक्सवर एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. त्या फोटोत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit bahujan Aghadi) पाठीत खंजीर खुपसणारा एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्या व्यक्तीच्या खंजीरवर लिहिलं आहे ‘संजय राऊत’ (Sanjay Raut). त्यामुळे यावर पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब होतंय की, महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्याजी पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे’, अशी सणसणीत टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी करणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊतने आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंमध्ये (Raj Thackeray) भांडणं लावली, ठाकरेंचं घर फोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांच्या आमदारांनी जेव्हा उठाव केला की शिवसेना वाचवा तेव्हा त्या चाळीसच्या चाळीस आमदारांचा आणि तेरा खासदारांचा रोष हा संजय राऊतवरच होता. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरी अजित पवारांनी (Ajit Pawar) जी भूमिका घेतली तेव्हाही सगळा रोष संजय राऊतवरच आला आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही तेच. यानंतर आता काँग्रेसही महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, अशी मला खात्री आहे. त्याला देखील संजय राऊतच जबाबदार असणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊतने खंजीर खुपसण्यामध्ये पीएचडी केली आहे. तो एकटा खरा आणि बाकी सगळे खोटारडे असं चित्र आहे. एका बाजूने म्हणायचं आम्हाला संविधान वाचवायचंय आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरचे व्यक्ती संजय राऊतलाच म्हणतात की याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग संजय राऊत कोणत्या तोंडाने संविधान वाचवण्याची भाषा करतात? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत संविधानाचा मारेकरी आहे यावर प्रकाश आंबेडकरांनीच शिक्कामोर्तब केलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…