Ram Satpute : हिंदूंना भगवा दहशतवाद म्हणणारे आता हिंदूंच्या मंदिरांना भेटी देतायत!

  141

'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' राम सातपुते यांची काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंवर खोचक टीका


सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या मंदिर भेटीवरून भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी खोचक टीका केली. 'काँग्रेसची (Congress) सत्ता असताना यांनीच भगवा दहशतवाद हा शब्द आणला, हिंदूंना दहशतवादी म्हटलं आणि आता हे मंदिरांना भेटी देतायत हे वीट आणणारं आहे', अशी टीका राम सातपुते यांनी केली. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या तुलनेत भाजपच्या १० वर्षांत काय झालं हे आम्ही सांगू, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवू असंही ते म्हणाले.


राम सातपुते म्हणाले की, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू, सोलापूरच्या युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे, आयटी पार्क झालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, टेक्सटाईल पार्क झाले पाहिजेत. सोलापुरात मोठ्या प्रमाणात सोलापूरला जोडणारे ४० हजार कोटींचे रस्ते आमच्या सरकारच्या काळात झाले. काँग्रेसने मागच्या ७० वर्षात काहीच दिले नाही. त्यामुळे आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे, असं राम सातपुते म्हणाले.



यांनी हिंदूंना भगवा आतंकवाद म्हटलं


सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या मंदिर भेटीवरून राम सातपुते यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, मंदिरांना विरोधकांनी भेटी देणं हे सॉफ्ट हिंदुत्व नसून डिसगस्टिंग प्रकार आहे. मुळात हिंदूंना दहशतवादी यांनीच म्हटले होते. हे गृहमंत्री असताना त्यांनी जी अॅक्टिव्हिटी राबवली ती हिंदूंना टार्गेट करण्याची होती. मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी'.


राम सापपुते म्हणाले की, हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणणं हा यांचा खरा चेहरा आहे. भगवा दहशतवाद म्हणणारे हेच लोक आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आमच्या संतांचे दर्शन घेत आहेत. पण इथले हिंदू त्यांचा खरा चेहरा जाणून आहेत. त्यामुळे आगामी काळात इथला हिंदू पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहे.



संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले?


सोलापुरातील काँग्रेसने जे काही केलं त्याची तुलना आमच्या विकासकामांसोबत करावी. राम सातपुते इथे उमेदवार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरची जनता मोदींच्या विकासकामावर विश्वास ठेऊन मतदान करेल. ही निवडणूक विकासाची, सोलापूरच्या भविष्याची आहे. सोलापूरची जनता सुशीलकुमार शिंदेंना विचारत आहे की, संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले? मोदींनी काय केलं याचा हिशोब आम्ही देतो. तुमचं आडनाव शिंदे आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, असाही टोला राम सातपुते यांनी लगावला.



आम्हाला विरोधकांना भिडायचं नाही तर...


ज्या मतदारसंघात प्रणिती शिंदे आमदार आहेत तिथून देखील भाजपला लीड आहे असं सांगत राम सातपुते म्हणाले की, तुम्ही वारसा चालवता आणि अनुकंपा तत्वावर तुम्हाला तिकीट मिळाले आहे. २०१४ ला ४८ हजार लीड आणि २०१९ च्या लोकसभेला ३७ हजाराची लीड प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपला मिळाली आहे. सोलापूर शहर मध्य मधील जनता यांना कंटाळली आहे. विरोधक हे फार धनाढ्य आणि मोठे लोक आहेत. मी सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांना नाही भिडू शकत नाही. आम्हाला भिडायचं नाही तर सोलापूरचा विकास करायचा आहे. विरोधक हे माजी मुख्यमंत्र्याच्या परिवारातील आहेत, त्यामुळे मी भिडणार नाही. सोलापूरच्या युवकाला काम मिळालं पाहिजे यासाठी मी जीवाचं रान करेन, प्रसंगी खासदारकी पणाला लावेन, असं राम सातपुते म्हणाले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ