Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

महापालिकेची प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरकर्त्यांवर धाड! ११ विक्रेत्यांकडून तब्बल ५५ हजारांचा दंड वसूल

महापालिकेची प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरकर्त्यांवर धाड! ११ विक्रेत्यांकडून तब्बल ५५ हजारांचा दंड वसूल

नाशिक : महापालिकेने प्लास्टिकवर बंदी घातली असूनही अनेक ठिकाणी प्लास्टिक विक्री आणि वापर चालूच आहे. याकारणाने महापालिकेकडून रोधक प्लास्टिक वापरकर्त्यांवर धाडी टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. शहरात विशेष पथकांच्या मार्फत दिडशे ठिकाणी तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरावर एकूण अकरा केस ठोकण्यात आल्या आहेत. तसेच वापरकर्त्यांकडून ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.


रोधक प्लास्टिक वापरकर्त्यांवर धाडी टाकण्यात आल्या असून अकरा ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्ते आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, हाताळणी व साठवणूक अधिसूचना, २०१८ च्या अंमलबजावणीचे आदेश काढले होते. त्यानुसार एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे.


महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली एकल वापराच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, महत्त्वाचे रस्ते आदी ठिकाणी जनजागृती तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागनिहाय विशेष पथके तयार करण्यात आले. त्याचप्रमाणे विभागामार्फत प्लास्टिक वापराच्या बंदी बाबत जनजागृती करण्यासाठी शहरात फलक लावण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment